बहाणे
बहाणे
क्षणात हसणे क्षणात रूसणे
नजरेला हळूच नजर देणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
गंध तू माळलेल्या गजऱ्याचा
हलकेच पसरतो चोहीकडे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
मान वळवून बघणे
बघूनही मग न बघणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
हलकेच स्पर्श होताच तुझा
हळूच दूर होणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
गीत ओठात गुणगुणता
लाजून लाल होणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
नकारातल्या होकारात
मजा वेगळीच आहे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे

