STORYMIRROR

vaishali Deo

Others

3  

vaishali Deo

Others

दिवाळीचे रंग

दिवाळीचे रंग

2 mins
127

गुलाबी थंडीची चाहूल जशी लागते

दिवाळीच जणू अंगणी येते

सुरू होते साऱ्यांची  लगबग

रांगोळी, दीप, फराळ, पणत्या

भेटवस्तू, आकाश कंदील आणि इतर 

या साऱ्यांचा मग मनात सुरू होतो जागर

बाजारपेठा   फुलु लागतातं

आशा आकांक्षा जागवतात

साऱ्यांना वेध लागतात त्या पहाटेचे

उटणं लावून, गरम फराळ खाण्याचे

एक एक दिवस मग उगवत जातो

सोनेरी किरणांची पहाट आणतो

कुठे लक्ष्मी करत असते मुक्त उधळण

तर कुठे कोणीतरी होत असतं

कुणाच्यातरी जगण्याचं कारण

आनंद उत्सव सुरू होतो

मैफिलींना बहर येतो

बाहेर प्रसन्न वातावरण

तर घरात गृहिणींची धावपळ

काय करू काय नको असे झालेलं असतं

लहान मुलांना नवीन कपड्यात वावरायचं असतं

दिवाळीच्या निमित्ताने होतात भेटीगाठी

नाहीतरी वर्षभर मग कोण येतं कोणाच्या घरी?

अभंग स्नानाची तर मजाच न्यारी

लक्ष्मीपूजनाने खरी फुलते दिवाळी.

पाडवा आणि भाऊबीज सण आहे नात्यांचा

बंधनात बांधतो भाऊ आणि बहिणीला

सुख सुख म्हणतात ते हेच असते

आपल्यालाच ते फक्त समजून घ्यायचे असते

पूर्वी तर दिवाळीचा खूपच रुबाब असे

कालानुरूप आता त्यात बदल झाला असे

पूर्वी गरिबीतही त्यात एकत्र पणाचा गोडवा असे

आता सधनतेतही त्याला तटस्थतेची किनार दिसे

तरीही दिवाळी ही दिवाळीच आहे

तिच्या संपन्नतेला कधीच तोड नसे

आनंद उत्साह वैभवाची पखरण होत असते

पाच दिवस चाललेल्या सणाची  सांगता होते

उरलेल्या फराळाची मग वाटाघाट चालू होते

पुढील काही दिवस मग ताटात तेच असते

मजेचा हा भाग वेगळा

पण दिवाळीचा थाटच आहे काही न्यारा


Rate this content
Log in