कोजागिरी
कोजागिरी
चंद्राची शीतलता, चांदण्याची मधुरता
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
केशरी आटीव दूध, आनंदाचा मेळा
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
लक्ष्मीचा वास, संगे तिचा आशीर्वाद
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
चंद्रावरचा डाग तसा ग्रहणाचा काळ
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
फेसाळणारा समुद्र, त्यात चंद्राचे प्रतिबिंब
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
परिजनांचा सहवास, सहज सुखाचा काळ
घेऊन आली ही शरद पौर्णिमा
काहीतरी वेगळाच नातं असतं
चंद्राचं आणि पौर्णिमेचं
जसं नितळ सौंदर्य आणि शांततेचं
तेजाच्या त्या उत्सवात
सारी पृथ्वी दंग झाली
साऱ्या चराचरात चेतना जागली