नवरात्र
नवरात्र
1 min
187
साऱ्या विश्वाची ती जननी
धामधुम असते तिच्या पूजेची
उत्साह असतो साऱ्यांच्या मनी
अश्विन महिना साऱ्यांच्या आठवणी
तीव्र होते आतुरता नवरात्रीची
डोलू लागते सारी सृष्टी आनंदानी
कृपादृष्टी असते मातेची
भक्तांना पर्वणी ती सेवेची
आनंद मावेना तो मनी
रूप तिचे साठवता नयनी
धन्य होती सारे लोचनी
हार तुरे ओटी आणि आरती
धामधुम सारी नवरात्राची
सुख आणि समाधान जागे साऱ्यांच्या अंतरी
हीच तर असे आपली संस्कृती
