विसर
विसर
जीवन प्रवासात असतात अडथळे
आठवणींचा पसारा सारा
मनात त्याचा खेळ मांडला
सोपे नसते सारे विसरणे
कधी असतो विरह,तर कधी भेट
कधी आनंदाच्या लहरी
तर कधी दुःखाचे भरते
सोपे नसते सारे विसरणे
कधी मिळते यश,तर कधी
अपयशाचा सामना
पचवावे लागते इथेच
सोपे नसते सारे विसरणे
कधी असते आनंदी सकाळ
तर कधी असते संध्याकाळ
हेच आहे सारे खरे
सोपे नसते सारे विसरणे
प्रयत्न केला तर विसरू शकतो
काही नकारात्मक आठवणी
मनात अनेक असतात सकारात्मक आठवणींचे ठेवे
म्हणूनच सोपे नसते सारे काही विसरणे
