सुगंध
सुगंध
सुगंध नेहमीच वाटतो हवाहवासा
नात्यामधला असो की प्रेमाचा
फुलांचा असो की अत्तराचा.
मनाचा कण न कण
फुलवून जातो, उरतो फक्त आनंद
सुगंध आहे निसर्गाचे देणे
तुझ्या माझ्या मधील स्पर्शाचे कंगोरे
सुगंधाला कुठलीच भाषा नाही
तो दरवळतो तेव्हा, फक्त उल्हास असतो
सगळ्यांनाच सुखावून जातो.
शब्दांचा सुगंध तर काय वर्णावा
भाषेच्या गोडव्यात तर तो कायम सामावला
प्रियकराच्या हातातल्या गुलाबाचा सुगंध
प्रेयसीला नेहमीच देतो आनंद
संसाराच्या गोडव्यातला सुगंध
पती-पत्नीच्या नात्यातले ते एक बंध
पसरवावा आपल्या गुणांचा सुगंध
खुलते ज्याने आपले व्यक्तिमत्व
श्रीहरीच्या प्राजक्ताचा परिमळ
आपलाच वाटे सदोदित
काळ्या मातीचा तो सुगंध
देतो अत्तरालाही मात
ईशतत्त्वाला हात जोडून जाणवतो
सृष्टीकर्त्याचा सुगंध
सुगंधाला नाही कुठलीच व्याख्या
म्हणून हवाहवासा वाटतो सगळ्यांना
