पुरुष
पुरुष
त्याग तर त्याच्यात भरलेला असतो काठोकाठ
तरीही तो सगळ्यांना खुश करण्याचा
प्रयत्न करत असतो आटोकाट
स्वतःच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी
घरातल्या सगळ्यांना खुष करतो वारेमाप
त्यालाही मन असतं, त्यालाही भावना असतात
पण कधीही त्याच्या चेहऱ्यावर दिसतं नसतात
तो पुरुष आहे म्हणून,
त्याला त्या दाखवायच्या नसतात
कारण समाजाने तसं ठरवलेलं असतं
व्यक्त व्हायला त्याला मुक्त केलेलं नसतं
सगळ्यांना वाटत असतं की तो भावना रहित आहे
पण आतली घुसमट त्याची त्यालाच माहिती असते
वडील म्हणून त्याला सगळे कर्तव्य पार पाडायचे असतात
इतरही नाती त्याला
उत्तम तऱ्हेने निभवावी लागतात
मनाने तो समर्थ असतो
असा अलिखित नियम आहे
पण त्यालाही कधीतरी रडायचं असतं
हेच कोणाला समजत नसतं
त्याच्या कक्षेमध्ये तो फिरत असतो
कोणीतरी सामावून घ्यावे म्हणून
वाट बघत असतो
मग समजूतदार घरातली मंडळी
वाटून घेतात त्याचे दुःख
बोल बोल म्हणून समजावतात त्याला खूप
पण भिडस्त पुरुष तो
कसा होईल व्यक्त?
त्याचेच त्याला समजेल तेंव्हा
वाटून घेईल आपल्या भावना आणि दुःख
