STORYMIRROR

vaishali Deo

Abstract

3  

vaishali Deo

Abstract

रे मना

रे मना

1 min
193

रे मना,का आळवतो राग हा जुना?

 विसरून जा आता घडलेल्या घटना

नवा आयाम दे आपल्या विचारांना

नवा अर्थ दे जुन्या शब्दांना

रे मना, का ठेवतोस सारे अंतरात?

उघड तुझी कवाडे अन् फेक बाहेर सारे 

तुलाही हक्क आहे शांत होण्याचा

नको उरी दडवू काही, हो आता मोकळे

रे मना, का फिरतोस विचारचक्रात?

संपणार नाही ही वादळे

घे आता तू त्याचे अर्थ नवे

सांगून टाक साऱ्यांना, तुला हवे ते

रे मना, नको जळू असे आत

कसे सांगू तुला ?माझे सारे गुपित तुझ्यात

वाऱ्यासारखी तुझी गती

शांत हो तू आता, किती धावसी?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract