कुंदा
कुंदा
1 min
53
ताटवा कुंद कळ्यांचा
अलवार पसरला
अंतरात सुगंध त्याचा
हळुवार वसला
चांदण्यांचा सडा
पसरतो अंगणी
निसर्गाचे दान
स्मरावे हृदयी
त्या धवल शुभ्र
कळ्यांचे गुज
कसे मी विसरू
आनंदाचे बीज
हिरव्या पानातला
सृजन अविष्कार
अनंताच्या देण्याचे
किती हे सोहळे
पंच पाकळी मध्ये
प्राण सामावले
किती घेऊ निसर्गातून
सात्विक फुलांचे देणे
मनातले कारंजे
थुई थुई नाचे
