सांजवेळ
सांजवेळ
तुझ्या डोळ्यांच्या दर्पणात
पाहिले मी मला
हातात हात घालून
पावले नीट रेखित
वाळूत चाललो तू नी मी
त्या ओल्या सांजवेळी.
विसरलो भान
विसावलो मिठीत
शब्दातीत होऊन
स्पर्शाच्या अनुभूतीत
चंद्राच्या साक्षीने
त्या ओल्या सांजवेळी.
त्या देहाच्या पलीकडे
अजून काही भावना आहेत
होऊन जाणीव त्याची
एकमेका पाहिले
हृदयाचे हृदयाशी नाते जुळले
त्या ओल्या सांजवेळी.
येशील ना तू सख्या
हाक देता मी
कुठलीच अपेक्षा नाही
सहवास तुझा हवा
गात्र गात्र फुलतील माझे
त्या ओल्या सांजवेळी
