भक्ती
भक्ती
भक्ती करा श्रीरामाची
तोची कर्ता करविता
तारण्यास भवताप
सुख आनंदाचा दाता
भक्ती असता मनात
येतो मदतीला देव
दृढ विश्वास हवाच
सदा अमुल्य ती ठेव
भक्ती होती तुकोबांची
तारीले तयाचे अभंग
जरी टाकले नदीत
तुका भजनात दंग
करा भक्ती ईश्वराची
असे महत्व जीवनी
भाव तेथे देव वदती
ठेवा सदा मनोमनी
