आदेश...
आदेश...
आदेश हा तुझा कसा रे विठ्ठला ,
मी चढले ना तुझी पायरी अजून,
तुझा वास माझ्या ,
मन मंदीरी वसला ...
मन तुझाच धावा करते सदा,
तहानभुख नाही त्याला,
दिवस रात्रीचीही पथ्य नाही,
काळी मुर्ती दिसली जेव्हा,
डोळे उघडेच आता सदा सदा ...
ऐकते मी विठ्ठल ,
बोलते मी विठ्ठल,
पाहते मी विठ्ठल,
आयुष्य सारेच विठ्ठल विठ्ठल...
विठ्ठला ऐकून घे तुही ,
आर्त हाकेचा अतरंगी सुर ,
मला दर्शन दे ना ,
भावविभोर भक्तीचा हा नुर,
उडाला बघ पेटत्या जिवाचा धूर,
क्षमणार हा दाह जेव्हा ,
दर्शन तुझे होईल विठ्ठला ,
आदेश हा तुझा कसा रे विठ्ठला...
