शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ'.*
शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ'.*


*घडविण्या नवभारत*
*असे जयाचे योगदान*
*राष्ट्राचा आधारस्तंभ*
*करितो सदा विद्यादान ll१ll*
*मिटवी तम अज्ञानाचा*
*खुले करी ज्ञानाचे आभाळ*
*झटतो दिनरात रेखण्या*
*लेकरांच्या भविष्याचे भाळ ll२ll*
*रिक्त जरी हात जयाचे*
*लाजवी हा कर्णास*
*महत्व देई सदैव*
*विद्येच्या थोर दानास ll३ll*
*विद्यार्थी हेच दैवत मानी*
*जाई ना कुठे राऊळी*
*शाळा हेच विश्व तयाचे*
*भजे याच सदा देऊळी ll४ll*
*स्वप्न पाहे सानुल्या डोळां*
*ज्ञानमंदिर हाच श्वास*
*कणा असे मम देशाचा*
*मनी ठेवी चैतन्याचा ध्यास ll५ll*