STORYMIRROR

Anjum Shaikh

Tragedy

3  

Anjum Shaikh

Tragedy

अवैध संतान

अवैध संतान

1 min
376

झोपे हिरव्या गालिच्यावर 

ओढूनी चादर चांदण्यांची, 

झालं आहे जगणं असह्य 

नाही भीती आता मरणाची... 


काही उमगत नाही मजला

आहे कोण, काय माझी जात?

जन्मला कसा या जगतात, 

कोण आहेत माझे मायबाप?... 


कसा वाढलो नि जगलो 

नाही मार्गच कळायला,

पण, बोधती सारे मजला 

कारटं मी कचराकुंडीतला!!...


लाज वाटणारे कृत्य असे 

करतातच का जीवनी? 

आहे ही मौजमजा तुमची 

कर्मफळ मात्र अवैध संतानी...


भित होते माझ्या जन्माने 

मग, करायचा होता गर्भपात!!

दिलाच होता जन्म जर, 

द्यायचं होत वांझेच्या घरात...

 

नजर झुकत होती तुमची 

माझे आईबाप बनण्याने,

मावला नसता आनंद गगनी 

एका वांझेचा, आई होण्याने... 


फळ मी, तुमच्या पापाचं 

दिलं नाव अवैध संतानाच... 

होतो अन्याय निष्पापांवर

खावं लागतं टोचणं जनांच... 


हो, आहे मी अवैध संतान 

पण नका करू माझ्याशी हेवा... 

केरात टाकलं माय बापानं 

यात माझं काय चुकलं देवा??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy