STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

2.6  

Arun V Deshpande

Inspirational

मन हे ...!

मन हे ...!

1 min
14.2K


धुक्यात हरवलेल्या वाटा

शोधिते शोधिते मन वेडे 

क्षितिजा पर्यंत असती वाटा 

धावते तिथ पर्यंत वेडे .....!

निळ्याशार निरभ्र अंबरी

मनपाखरू फिरे भिरीभिरी

सायंकाळी संधिप्रकाशी 

फिरे माघारी मग मन वेडे ...!

 कोवळ्या उन्हात पहाटेच्या

होई पुन्हा रोज ताजेतवाने

निराशा कालची विसरुनी 

मन भिडे जीवनास नव्याने ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational