त्या तिथे क्षितिजा पल्याड
त्या तिथे क्षितिजा पल्याड
त्या तिथे क्षितिजा पल्याड कुणी
वसवलाय जणू प्रेमाचा गाव
तिथे नांदते सुख - समृद्धी
अखंड वाहतो प्रेमळ झरा
म्हणे तिथे ना भांडण तंटे ,हेवेदावे
शह - काटशह... ना कुठले हेवेदावे
कसला गोंगाट ना कोलाहल तिथे
सबंध पसरलीय निरव शांतता
जात धर्म ना तिथे प्रादेशिकता
सामान हक्क स्त्री - पुरुष समानता
प्रेमाची भाषा सगळ्याना कळते
लक्ष्मी अन सरस्वती एकत्र नांदते
नित्यनेमाने सूर्य उगवतो
मोर नाचतो बेभान होऊन
खूप बरसते श्रवणधारा
तृप्त होते सृजननाने धरा
हिरवा शालू लेवून धरा
आग ओकतो सूर्य पुन्हा
चोहीकडे हिरवळ दाटते ...
चराचर सृष्टी विलोभनीय
