पुण्यश्लोक अहिल्या
पुण्यश्लोक अहिल्या
रणरागिणी अहिल्या तू
तू तळपती तलवार
राष्ट्रराक्षिण्या झेललेस तू
छातीवरती वार
बनून तपस्विनी तू
सांभाळलास संसार
तेजस्विनीचे रूप घेऊनी
शत्रूवर केलास प्रहार
आप्तस्वकीयांच्या मृत्यूनेही
ना मानलीस तू हार
तुझ्या एकखांबी नेतृत्वाने
चालविला राज्यकारभार
अहिल्या तू राणी आमुची
नवतरुणींना स्फूर्ती देशी
रोवूनी स्वराज्याची पताका
मराठी मनावर राज्य करशी
स्त्री जन्माचे सार्थक केले
स्तुतिसुमनानी गौरविले
बनुनी शत्रूचा कर्दनकाळ
कर्तृत्वाचे इतिहास रचले
