STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Inspirational

3  

Snehlata Subhas Patil

Inspirational

संघर्ष

संघर्ष

1 min
255

स्वतःच्याच घरात कैद आहोत

गेली एक वर्ष

जगण्याच्या आसक्तीसाठी

सुरू आहे संघर्ष


पोटासाठी भटकतोय

गेली कित्येक वर्ष

भाकरीचा चंद्र शोधण्याचा

सुरू आहे संघर्ष


कितींदा आम्ही चुकवायचा

वासनांध नजरांचा स्पर्श

स्त्री मुक्ती लढ्यासाठी

सुरू आहे संघर्ष


संस्कारहीन समाज

हाच निघतो परामर्श

निरोगी समाज घडवण्याचा

सुरू आहे संघर्ष


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational