कोरोनाचा महापूर
कोरोनाचा महापूर
विधात्या कसला रे तू
चालावंलास खेळ
श्वासाचा श्वासाशी
बसेना ताळमेळ
आता तरी थांबव
हे मृत्यूचे तांडव
प्रत्येकाच्या दरात आहे
तेराव्याचा मांडव
इतका कसा रे तू
निष्ठुर झालास
तूच निर्मिलेल्या जगात
कित्येकांना पोरक केलास
नवजात बाळसुद्धा
आईपासून झाले दूर
कधी ओसरणार हा
कोरोनाचा महापूर
