प्रेमाची उधारी
प्रेमाची उधारी
काट्याकुट्यात फिरते, पुसते न कोणी
आई समान जगती, झिजते न कोणी
रात्रीस जाग धरुनी, निजतेय आई
डोळ्यात तेल भरुनी, जपतेय आई
बाळास माय दिसता, सुखनैव वाटे
आनंद हाच नयनी, भरपूर दाटे
वात्सल्य प्रेम असले, मिळणार कोठे
केव्हा फिटेल अवघे, उपकार मोठे
आईशिवाय नृमणी, दिसतो भिकारी
जन्मात कोण अवघ्या, चुकवी उधारी
