श्वासांचे तू दान दे
श्वासांचे तू दान दे
धडपडणाऱ्या या जीवांना
जगण्यासाठी प्राण दे
अंतिम घटिका मोजनाऱ्याला
श्वासांचे तू दान दे
किती दिवस जगणार आम्ही
घेऊनी श्वास गहाण हे
झगडणाऱ्या याचकाना
श्वासांचे तू दान दे
मृत्यूच्या छायेतल्याना
जीवनाचे वरदान दे
तडफडणाऱ्या जीवाना
श्वासांचे तू दान दे
अजूनही आहेस तू
याचे जगाला प्रमाण दे
तुझ्या आशेवर जगणाऱ्याना
श्वासांचे तू दान दे
