STORYMIRROR

Supriya Zinjurde

Inspirational

3  

Supriya Zinjurde

Inspirational

ऑक्सिजन

ऑक्सिजन

1 min
300

झाडे लावा झाडे जगवा

 निसर्ग जेव्हा सांगत होता

तरीही कत्तल चालू होती

माणूस मात्र थांबत नव्हता


 कोरोना वायरस आला

श्वास मग घेता येईना

ऑक्सिजन कमी पडले

जीव तडफडून गेले ना


निसर्गाशी खेळु नका

समतोल तिचा ढासळला

दर शंभर वर्षांने मग येते

महामारीने माणूस कोसळला


पैसा गाडी बंगला नको

कोणीतरी *ऑक्सिजन*द्या ना

प्रत्येक जीव आहे महत्वाचा

आता. तरी घरी थांबा ना


कोव्हिड योद्धा काम करतोय

जीवाची पर्वा करत नाही

त्यांना मदत एकच करा

रुग्णांची भर पडणार नाही


किराणा बाजार रोज मिळतो

दुकाना समोर गर्दी कशासाठी

आपला जीव जास्त महत्वाचा

नियम पाळा आपल्या देशासाठी


विनंती करते सर्व नागरीकांना

घरी रहा व सुरक्षित रहा

तुमची गरज खुप कुटुंबाला

 अवलंबुन आहे तुमच्यावर पहा


पर्यावरणाचे संतुलन राखण्यास

 एकतरी झाड आपण लावू या

हवा, जल, भू, प्रदुषण रोखून

वसुंधरेला हिरवाईने नटवू या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational