बाप
बाप
1 min
178
आहे घराचा आधार
जबाबदारी पाडतो पार
जीव लावतो अपार
काही प्रसंगी खंबीर
काळजी करतो घराची
ओढ त्याला कुटुंबाची
गरज पुरवी सगळ्यांची
शिक्षा देतो चुकिची
बाहेरून वाटतो कठोर
नाही बाप हो निष्ठुर
काळजी असते अपार
सावरतो तोच घर
बापाचा डोक्यावर हात
कुटुंब आहे ते भाग्यवंत
आई माया जेव्हा करत
बाप कुटुंबासाठी कष्टत
एकच मागणं परमेश्वराला
बापाचा आशिर्वाद ज्याला
समाजात किंमत त्या घराला
बापासाठी दिर्घायुष्य मागा देवाला
