ऑक्सिजन
ऑक्सिजन
झाडे लावा झाडे जगवा
निसर्ग जेव्हा सांगत होता
तरीही कत्तल चालू होती
माणूस मात्र थांबत नव्हता
कोरोना वायरस आला
श्वास मग घेता येई ना
ऑक्सिजन कमी पडले
जीव तडफडून गेले ना
निसर्गाशी तुम्ही खेळु नका
समतोल तिचा ढासळला
दर शंभर वर्षांने मग येते
महामारीने माणुस कोसळला
पैसा गाडी बंगला नको
कोणीतरी *ऑक्सिजन*द्या ना
प्रत्येक जीव आहे महत्वाचा
आता तरी घरी थांबा ना
कोव्हिड योद्धा काम करतोय
जीवाची पर्वा करत नाही
त्यांना मदत एकच करा
रुग्णांची भर पडणार नाही
किराणा बाजार रोज मिळतो
दुकाना समोर गर्दी कशासाठी
आपला जीव जास्त महत्वाचा
नियम पाळा आपल्या देशासाठी
विनंती करते नागरीकांना
घरी रहा सुरक्षित रहा
तुमची गरज आहे कुटुंबाला
शासनाची नियमावली पहा
जल, हवा, भू, प्रदूषण आता
होणार नाही जबाबदारने वागा
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास
वृक्ष लागवडीचे वचन मागा
ऑक्सिजन किती महत्त्वाचा
जगाला आता किंमत कळली
झाडे लावा, जगवा हा संदेश
देश देण्यासाठी सगळी वळली
कोरोनाने जी आपली गेली
त्यांच्यासाठी एक करू या
आपल्या घरासमोर एक नक्की
त्यांच्या आठवणीचे झाड लावू या
