कोरा कागद
कोरा कागद
सहज गेली नजर
कोऱ्या कागदावर
पाहुनी माझ्याकडे
हसला माझ्यावर
विचारे मला कुठे
तुझी शब्दसरिता
हल्ली न लिहिसी
माझ्यावर कविता
कोरा कागद म्हणे
न तू भेटी मजसी
शब्द न साथ देती
बोले कोण तुजसी
घेऊनी विचारांची
उंच गगन भरारी
निळ्या शाईचे रंग
उतरी कागदावरी
सुख दुःखाचे प्रसंग
येता तू थांबू नकोस
काळीज काढून ठेव पण
कागद कोरा ठेवू नकोस
