संयम
संयम
संयमाचे युद्ध असे स्वतःशी
लढा दे नको घाबरू कोणाशी
हीच आहे जीवनातील परीक्षा
इथे सोबती न कुणाचा कोणाशी
साधायचे असेल ध्येय
तर धर संयमाची कास
वेळ होईल थोडा पण
यश मिळेल हमखास
मिळेल त्या संधीचे करा सोने
योग्य संधीची नका पाहू वाट
संयमाने पूर्ण होईल सारे काम
नाहीतर विरून जाईल सर्व थाट
दुःखाचे दिवस जाता
येती दिवस सुखाचे
संयमाचा मान ठेवता
मिळेल यश कामाचे
रागाच्या प्रत्येक क्षणी
नको रे वाहू अहंकार
पश्चातापाची वेळ नको
संयम हाच एक आधार
