भक्तीगीत
भक्तीगीत
गणपती बाप्पा गणपती बाप्पा
तुम्ही दिसता फार छान
लांबच लांब सोंड
आणि सुपासारखे कान
तुम्ही आल्यावर देवा
आम्हाला खूप आनंद होतो
प्रसादाचे लाडू मोदक
आम्ही ही खूप खातो
लाडू मोदक खाऊन बाप्पा
वाढलीना तुमची ढेरी
उंदीरमामावर बसुन तुम्ही
कुठे कुठे हो मारता फेरी ?
वर्षातुन एकदाच येता तरी
घरी जाण्याची करता घाई
आमच्या सारखेच तुम्हालाही
रागवते का हो तुमची आई ?
विद्देची बुद्धीची देवता
म्हणतात सारे तुम्हाला
पाया पडतो बाप्पा
आशिर्वाद द्या आम्हाला
