STORYMIRROR

daivashala puri

Inspirational

3  

daivashala puri

Inspirational

॥प्राणवायू ॥

॥प्राणवायू ॥

1 min
264

झाडे तोडताना कधी 

नाही हात आवरला 

प्राणवायूच्या अभावी 

श्वास का मग थांबला 

 

जे दिलेले निसर्गाने 

भरभरून ओंजळी 

सांडिले तोडून सारे 

गार हिरवी ही मळी 

 

आपलेच आपण झालो 

शत्रू आपल्या जीवाचे 

रोप नाही लावीले तू 

महत्व जाणूनी त्यांचे 


वृक्ष वल्ली वनचरे 

असती आम्हा सोयरे 

संत हे सांगून गेले 

सत्य वचन हे खरे 


वृक्षच देतात आम्हाला

आरोग्यदायी जीवन

चला मग लावू या झाडे 

आणि करू त्यांचे संगोपन 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational