STORYMIRROR

daivashala puri

Romance

3  

daivashala puri

Romance

हुरहुर

हुरहुर

1 min
210

आता हळूहळू ती होईल सांजवेळ 

आकाशी तारकांचा रंगेल छान खेळ 


थकून भागून घरी निघे दिनकर 

भेटी तव सख्याच्या निशाराणी आतुर 


सजून वाट पाहे निशा दिनकराची 

मनात हुरहुर आतुरता भेटीची 


पेटवून चांदण्याचे दिवे अंगणात 

काहूर आठवांचे तेवणा-या दिव्यात


मनी मिलनाचे घेऊन स्वप्न नयनी 

गालात हसे गोड हळूच निशाराणी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance