स्वप्न
स्वप्न
स्वप्न म्हणजे स्वप्न म्हणजे
स्वप्नच असते
अनेकदा स्वप्नात आपल्या
खरे तेच दिसते
स्वप्नात मी एकदा
झाले होते परी
निळ्या निळ्या आकाशात
घेत होते भरारी
कापसासारखे शुभ्र ढग
मला खेटून जात होते
चंद्रासोबत खेळावया
तारे सारे येत होते
एवढ्यात मी खाली पाहिले
दिसली सुंदर वनराई
पशुपक्षी ही आनंदाने
कोकीळ सुरेल गाणे गाई
तिथे अचानक माणसांचे
एक टोळके आले
हातातील हत्याराने
झाडे तोडावया निघाले
क्षणात त्यांनी झाडे तोडून
जमीन दोस्त केली
पशुपक्षी अन् पाखरे
सारे बेघर हो झाली
संपले होते सगळे
गेला होता निवारा
सैरावैरा पशुपक्षी
उरला नाही थारा
माणसांच्या या कृत्याने
खूप मन दुखावले
हुंदक्यांनी जाग आली
आणि स्वप्न माझे सरले
