!!आक्रोश वसुंधरेचा !!
!!आक्रोश वसुंधरेचा !!
1 min
236
ऊन कडक तापले
वसुंधरा भेगाळली
थेंब नाही हो पाण्याचा
तिला तहान लागली
तिच्या पोटातील पाणी
सारं गेलय आटूनं
पाण्याविना हाल झाले
तन गेलय फाटूनं
तीच्या पोटातली झाडे
कापली हो माणसाने
सारी भकास पडली
वसुंधरे तुझी वने
जाग येऊ दे माणसा
आता तरी हे थांबवं
एक वृक्ष हा लावून
वसुंधरेला वाचवं
