पाणी
पाणी
पाणीप्रश्न भयंकर
लिहून नाही सुटणार
करू ठोस नियोजन
शोधू उपाय त्यावर
गेली पाण्याची पातळी
खोल पृथ्वीच्या पोटातं
संपले हो स्त्रोत सारे
मन चिंतेने दाटतं
पृथ्वीच्या या पोटातले
थेंब पाण्याचे आटले
जमीन ही ओके आग
पोटाला हो तडे गेले
सिमेंटच्या जंगलात
पाणी मातीत मुरेना
आलेल्या हो पावसाचा
थेंब एकही उरेना
वृक्षतोड झाली खुप
बांधकामे ही वाढली
पाउसही कमी झाला
धरा कोरडी पडली
पशुपक्षांना प्यायला
थेंब पाण्याचा मिळेना
गुरढोरं पाण्यासाठी
सोसतात हो यातना
एक घागर पाण्याला
कोसकोस पायपीट
थेंबा थेंबाला जपती
जशी सोन्याची हो विट
वृक्ष वल्ली ही वाळती
गुरेढोरे हो उपाशी
पाणी प्यायला मिळेना
विकतात कसायाशी
पाण्या वाचुन जमीन
रान पडलं उघड
हिरवळ हो दिसेना
अंग टाकतात झाडं
पाऊस हा येण्यासाठी
वृक्ष लागवड करू
पडलेल्या पावसाचे
पाणी थांबवून धरू
उपलब्ध या पाण्याचा
करू नये अपव्यय
जरा जपुन वापरू
करू असा हो निश्चय
जलयुक्त शिवाराला
देऊ सारे प्रोत्साहन
आडउया पावसाला
शेती बंधारे बांधुन
पाणी आडवा जीरवा
गावी करू आचरण
आपल्याच भविष्याची
सोय करू या आपण
