निसर्ग
निसर्ग
हिरव्या निसर्गाचा ठेवा
सारे करू या जतन
वेडेपणा नको करू
वृक्षवल्ली या कापून
वसुंधरेच्या कुशीत
चला एक रोप लावू
पाणी ओंजळी ओंजळी
त्याला रोज नित्य देवु
वाढलेल्या वृक्षवल्ली
फळे फुले ही देतील
त्यांच्या शीतल छायेत
जग सारे विसावेल
रानातील वृक्षवल्ली
हिरव्या गार निसर्गात
थेंब घेऊनी पाण्याचे
मेघ येतील नभात
रिमझीम पावसानं
वसुंधरा सुखावेल
भरघोस येई पिक
धन धान्य हो मिळेल
चला मिळून करू या
हिरव्या धनाचे जतन
निसर्ग हा मदतीला
थांबेल हे प्रदूषण
सांगतो मी आरे वेड्या
निसर्गची आपुले धन
वेडेपणा नको करू
वृक्षवल्ली या कापून
