॥निसर्गचक्र॥
॥निसर्गचक्र॥
किती आर्जव करू तुम्हा
आणखी सूर्य देवा
ताप हा आता सहन होईना
आपला राग शांत करावा
तुमच्या तापाने पहा
पाणी सर्व आटले
हिरवळ सगळी गेली करपून
सारे माळरान झाले
पशुपक्षी अन् मुके जीव
मरायला लागले
अन्न पाण्या वाचून सारे
गलीत गात्र झाले
स्वार्थी माणूस करतो
वृक्षतोड अमाप
जंगल तोडून बांधून बंगले
वाढवी जमिनीचा ताप
पशूपक्षांना नाही राहिला
आसरा जंगलात
म्हणून शिरती पशू श्वापदे
जंगलात वसलेल्या घरात
प्राण्यांच्या या वस्तीमध्ये
आता माणसे रहातात
त्याच्या जागेत शिरकाव करून
घरे आपली बांधतात
आसरा नाही मिळत त्यांना
क्षणीक विसावा घ्यावया
माणसाच्या बिछान्यात
मग येती ते झोपावया
त्यांच्या घरात शिरला माणुस
हिरावून घेतली त्याची घरे
कुठे जातील ही वन्य श्वापदे
कुठे शोधतील आसरा वनचरे
किती जुळवून घ्यावे
त्या बिचाऱ्या जंगली श्वापदांनी
थांबेल का ही जंगल तोड
त्यांना न्याय देईल का कोणी
चुक असुन स्वार्थी माणसाची
दोष मात्र त्यांना देतो
माणूस आणि श्वापदाच्या द्वंद्वात
नेहमी माणूसच जिंकतो
म्हणून देवा तुम्ही तरी
दया करा या मुक्या जीवांची
पाण्यावाचून वणवण फिरती
तडफड होते हो त्यांची
येतील झरझर सरी पावसाच्या
थांबेल ताप जीवाचा
पाणी मिळेल चहूकडे
जीव वाचेल वनचरांचा
जाग तुला माणसा
आता तरी येऊ दे
निसर्गाच्या चक्राला
आता तरी तू राहू दे
