STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Inspirational

3  

Snehlata Subhas Patil

Inspirational

चंदन

चंदन

1 min
455

भाव मनी चंदनाचा

दुसऱ्यासाठी झिजण्याचा

देह स्वतःचा झिजवून

दुसऱ्यास सुगंध देण्याचा

   देह झिजला

   काया सुकली

    तरीही जीवनात

   मीच का एकली

चंदना तुझ्या मनी

कधीच नाही स्वार्थ

नेहमीच कृतीने तू

साधतोस परमार्थ

    कशाचीच तमा नाही

    स्वार्थी या जगात

     जो तो दंग आहे

     एकमेका लुटण्यात

सुगंध देण्या दुसऱ्याला

झिजते चंदनाचे खोड

हे जाणून तरी मानावा

तुझा स्वार्थीपणा सोड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational