STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Inspirational

3  

Snehlata Subhas Patil

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
205

आयुष्याच्या रणरणत्या उन्हात

शीतल चांदण्यांची 

बरसात घेऊन

येते ती मैत्री


अंधाऱ्या रात्रीत 

वाट चुकली असता

प्रकाशाचा कवडसा

होऊन येते ती मैत्री


आयुष्याच्या कातरवेळी

एकटेपणाने मन गहिवरते

तेव्हा प्रेमाने जवळ घेऊन

मी आहे ना म्हणते ती मैत्री


स्वार्थी या जगामध्ये

मैत्रीचे तू देणे दिलेस

ईश्वरा तुझ्या या कृपेने

जन्मभर मला ऋणी केलेस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational