Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Latika Choudhary

Inspirational

3  

Latika Choudhary

Inspirational

दास्य

दास्य

1 min
6.7K


हे पुत्री ,

आर्यकालीन आचारसंहितेवर

आधारलेली तुझी प्रतिमा

डागाळते कधी कधी

प्रतिष्ठीतांचे 'आदर्श'

सांभाळताना......!

हे भगिनी ,

वेदग्रंथ,पुराण, परंपरेच्या

विश्वासाच्या पसाऱ्यात

फुलत राहते आजही

बघ दास्य तुझे

उडतांना........!

हे माते ,

'वेदकालीन स्त्री स्वतंत्र होती'

हे 'मिथ' कवटाळून बसली

आहेस उराशी ,

पण...

'बीज - क्षेत्र-न्याय ' संहितेतील

फक्त 'मादी' तू आजही

जगतांना.....!

हे नारी ,

"पतीचे अनुगमन करावे,

त्याला पूरक व्हावे "

या मूल्यचौकटीत बंदिस्त तू

तुझे संकटात सतीत्व

फुलतांना........!

हे सबले ,

ठरलेल्या ढाच्यातुन

चौकटीला छेदत

आजशी नाते जोडणारी तू

आठवशील का जरा त्या

भूतकालीन सावल्या तुझ्या

'दास्य' झुगारलेल्या..

लढतांना......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational