कोणी असें असावे
कोणी असें असावे
एकदा तरी आयुष्यात कोणी असे असावे
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे
सांगता सांगता सारे आयुष्य सरतच जावे
सरता सरतानाही हे आयुष्य पुन्हा जगावे.....
एकदा तरी आयुष्यात कोणी असे असावे
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे
पण थकल्यावर आधारासाठी त्याच्याकडे बघावे
एकदा तरी आयुष्यात कुणी असे असावे.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे असावे
दुःख त्याचे नि अश्रू माझे असावे
माज्या मनातल्या आनंदाला त्याने हसून ओंजळीत घ्यावे
त्याने झेललेल्या अश्रूचेही मोती व्हावे
एकदा तरी आयुष्यात असे कोणी असावे
