STORYMIRROR

Eshawar Mate

Inspirational

3.0  

Eshawar Mate

Inspirational

।। जिजाऊ ।।

।। जिजाऊ ।।

1 min
16.2K


विदर्भाचा सन्मान जिजाऊ

मराठमोळा मान जिजाऊ।

महाराष्ट्राची शान जिजाऊ

स्वराज्याचे उत्थान जिजाऊ ।।...

शिवगुरू, शिव मार्गदाती

शिवधर्माचे उड्डान जिजाऊ।

धर्मांधांनी खोल गाडलेल्या

मानवतेचे जीवदान जिजाऊ।।...

रयतेसाठी म्हणे लढ शिवबा

शिव प्रेरणेची खाण जिजाऊ।

शिव शाहीतील वीर गाथेच्या

इतिहासाचे पान-पान जिजाऊ।।...

शोषणाच्या छातीत घुसलेला

समतेचा शिवबाण जिजाऊ।।...

तमाम रयतेची माय माऊली

विषमतेवर संधान जिजाऊ।।...

स्फुर्तीदायक अन शौर्याचे

ठरली नेहमी तूफान जिजाऊ।

स्वातंत्र्याच्या शिव एल्गाराचे

होती बळकट स्थान जिजाऊ।।...

लखुजींराजांची लेक गुणाची

सून मालोजींची गुणवान जिजाऊ।

वीर शहाजींची शूर अर्धांगीनी

शिवक्रांतीचे निशाण जिजाऊ।।...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational