STORYMIRROR

Eshawar Mate

Abstract Others

2.9  

Eshawar Mate

Abstract Others

आई-बाबा

आई-बाबा

1 min
12.9K


वारापाणी,ऊन,थंडी, जुंपूनीया बैलबंडी ।

झटतात गरीबीशी, नयनी स्वप्न ऊतरंडी।।

स्वप्न सुखाचं माझ्या पाहत झोपी जातात।

गावाकडे शेतात, मायबाप राबतात।।धृ।।

मला दिला जन्म,कष्ठाने मोठं केलं।

स्वतः राहून ऊपाशी,मला खायला दिलं।।

मोठ्या आशेने दिले होते, पुस्तक माझ्या हातात।।१।।

रोज भांडी घासत, माय म्हणे हसत।

पोर माझं गुणाचं,शिवबा वानी दिसतं।।

ऊसने हसून नेहमी दुःख स्वतःचे लपवतात।।२।।

शिकून पोर माझा साहेब मोठा व्हावा।

सन्मानाचा पूर पायी त्याच्या वहावा।।

मी शिकावे म्हणून ते रात्रंदिवस झटतात।।३।।

बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई।

मी का मानू कुणाला, दैवत बाबा-आई।।

तेच वाढवतात आणि तेच घडवतात।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract