STORYMIRROR

Eshawar Mate

Tragedy

2  

Eshawar Mate

Tragedy

सरकारा तुझी पगडी मळू नको देऊ

सरकारा तुझी पगडी मळू नको देऊ

1 min
13.7K


सरकारा तुझी पगडी मळू नको देऊ।

घरदार शेतकऱ्यांचे जळू नको देऊ।।धृ।।...

आवर ते अधिकारी, भ्रष्टांची घोडदौड

सावकार, दलालां हातून छळू नको देऊ।।१।।

राब-राब राबती , पोशिंदे जगासाठी,

कष्टाला मिळो किंमत, हित टळू नको देऊ।।२।।

दुष्काळ आला चालून, जहर नांगीत घालून,

महागाई च्या आगीत, मले पोळू नको देऊ।।३।।

शेती सोडून आता, युद्ध लढावे म्हणतो,

तोल शेतकऱ्यांचा असा ढळू नको देऊ ।।४।।

ही धरणी काळी माती, माय मानतो बळी,

हक्क शेतकऱ्यांचा ऊधळू नको देऊ।।५।।

भिक मागन्याचा इतिहास नाही त्यांचा,

हात देहावरून दोन्ही गळू नको देऊ।।६।।

शिवकवी शेतकऱ्यांची भरभराट होवो,

माथा भ्रष्ट लुटारूंचा ऊजळू नको देऊ।।७।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy