STORYMIRROR

Eshawar Mate

Others

3  

Eshawar Mate

Others

तो बाप कुणाला आठवतो

तो बाप कुणाला आठवतो

1 min
28.4K


जिजाऊसवे सुपुत्र शिवबा

जहागीरी पुण्यास पाठवतो।

गहिवरतो अश्रृ आटवतो

तो बाप कुणाला आठवतो।।धृ।।

स्वराज्यासाठी त्याग हा

जिजाऊ अन शहाजींचा।

अशाच त्यागातून घडतो

शिवछत्रपती वाली रयतेचा।।

विरहामधला एक-एक क्षण

लढन्यासाठी साठवतो।।१।।

समाजात या ऐक्य साधतो

मानतो शौर्य हिच मालमत्ता ।

गनिमांची संपवून सत्ता

बलिदानाचा गीरवत कित्ता।।

स्वराज्यरक्षक भूमिका वठवत

 वैऱ्याला धूळ चाटवतो।।२।।

विरयोद्धा सुपुत्र शिवबा

हिच कमाई शहाजींची।

संकल्प सिद्धीसाठी झटले

शृंखला प्राणाच्या बाजीची।।

समाज दुहींनी व्यापलेला

तिथे रोप ऐक्याचे वाढवतो।।३।।


Rate this content
Log in