एक पान
एक पान
क्रांतिकारी अन कल्याणकारी
प्रबुद्ध बहुजन भावाचं।
असावे ऊद्याच्या इतिहासात
एक पान तुमच्या नावाचं।।धृ।।
कुणी संशोधक कुणी प्रेरणा व्हा
नवतंत्रज्ञानी व्हा मुद्रा करारी।
ऊन्नतीच्या भट्टीस तापवा
ऊद्योगात घ्या कुणी भरारी।।
सरण एकदा रचून टाका
कायम नादारीच्या घावाचं।।१।।
कवि, लेखक होऊन बेहतर
द्या झळाळी व्यक्तीमत्वाला।
नित ध्येय नवे सर्वोच्च गाठा,
धारण करावे शिव तत्वाला ।।
मेंदूत आणि मनगटात शोधा
ठिकाण यशाच्या गावाचं।।२।।
वकिल मोठा, डाँक्टर, कलेक्टर
मेहनत करून होसाल अँक्टर ।
I,A.S. , I.P.S. व्हा रे
या देशाचे व्हा प्राइम मिनीस्टर।।
अशक्य नसते काहीच लढा,
गात कवन ईश्वर भावाचं।।३।।
