मैलाचे पत्थर व्हावे
मैलाचे पत्थर व्हावे
1 min
40.8K
वाटेवर आयुष्याच्या, मैलाचे पत्थर व्हावे ।
मानवतेच्या स्पर्शाने, हे जीवन अत्तर व्हावे।।...
पोटासाठी दिन-राती,राबत असतो 'बा' माझा
'बा' च्या हिरव्या शेताने, देहावर लक्तर व्हावे।।...
शेतामधली हिरवळ का? श्रीमंती व्यापाऱ्याची
शेतकऱ्यांना पडलेल्या, प्रश्नाचे उत्तर व्हावे।।...
लेकाला अन लेकीला इतके शिकवा बापांनो
चंदन व्हावे जीवन अन मेंदू बलवत्तर व्हावे।।...
उद्धाराचा एकच पथ, गावामधल्या शाळेचा
मेहनतीने बापाच्या, पुस्तक अन दप्तर व्हावे।।...
