STORYMIRROR

Eshawar Mate

Others

3  

Eshawar Mate

Others

मावळ्यांनो

मावळ्यांनो

1 min
14.2K


वीर शिवबा बना,मावळ्यांनो तुम्ही

माँ जिजाऊ बना, मावळ्यांनो तुम्ही।।

हो तुकोबा नरा, शंभूराजा स्मरा

शूर योद्धे बना,शिव गड्यांनो तुम्ही ।।

शिक्षणाची नवी, घ्या भरारी जरा

नव यशाचा थवा,गाठल्यांनो तुम्ही ।।

पारतंत्र्यातली, क्रांतिकारी कथा

सांगते व्हा अता,जानत्यांनो तुम्ही।।

वादळांची व्यथा, जी मनी वाढली

वाट द्या त्या मना, झापड्यांनो तुम्ही।।

सोबतीला जरा, फक्त पेनास द्या

गाडत्यांनो तुम्ही, जाळत्यांनो तुम्ही।।

ध्येय धारण करा, व्हा झगडते जरा

रंजल्यांनो तुम्ही, गांजल्यांनो तुम्ही।।

आग विझवा जरा, लावलेली मनी

मातल्यांनी जरी, पाहत्यांनो तुम्ही।।

जानता हो जना, दुःख का लाभले

भाळल्यांनो तुम्ही, भाजल्यांनो तुम्ही।।

हर गुलामी सदा, अंतरी जी वसे

बुद्ध वाली अदा,चाहत्यांनो तुम्ही।।

पारतंत्र्यातली, क्रांतिकारी कथा

सांगते व्हा अता,जानत्यांनो तुम्ही।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन