STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

माझी दिदी

माझी दिदी

1 min
194

गोरी गोरी पान

फुलासारखी छान!!

माझी दिदी मला भासे

एकदम आई समान!!


माया करी सर्वांवरी

स्वभाव तिचा कोमल!!

हदयात वसते नेहमी

साडी घालते मलमल!!


छंद तिला नवनवीन

आहे ती किचन क्वीन!!

सर्वगुणसंपन्न अशी

सतत संसारात लीन!!


अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

अशी मोर्‍यांची कन्या!!

मोहत्यांची सून झाली

शिवाजीरावांची सुकन्या!!


दिसणे तीचे लाघवी

जशी बाबांची सावली!!

कर्तृत्ववान माझी बहीण

बनते सर्वांची माऊली!!


कशी वर्णू तिची महती

शब्दात मांडणे शक्य नसे!!

तिच्यामुळेच माझ्या जिवनाला योग्य असा अर्थ असे!!


तुझीच छोटी बहीण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational