STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

का मन हे झुरते

का मन हे झुरते

1 min
27

आई बाबा माझे प्रिय

झुरते मन त्यांच्यासाठी!! 

आठवण येते त्यांची

पाणी येते डोळ्याकाठी!!


मन सदैव झुरते आई-बाबांसाठी

गेले ते दिवस राहिल्या आठवणी!!

केली तुम्ही माझी

सासरी पाठवणी!!


झुरते मन माझे नेहमी

त्या माझ्या बालपणात!!

त्या माझ्या सखी मध्ये

त्या माझ्या आनंदात!!


झुरते मन माझे

त्या शाळेच्या अभ्यासात!!

त्या शाळेच्या आठवणीत

त्या लहानपणीच्या खेळण्यात!!


झुरते मन माझे

कॉलेजच्या कट्टा मध्ये!!

कॉलेजच्या जीवनातील

गमतीजमती मध्ये!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational