मी आहे ना.. तूझासाठी..
मी आहे ना.. तूझासाठी..
कोसळू दे कितीही दुःखाचे डोंगर अन् उसळू दे भावनांच्या लाटा..
त्यात खांद्यावरती हात ठेऊन धीर देणारा असावा..
मी आहे ना तुजसाठी अस म्हणणारा एक तरी मित्र असावा..!! द्रु!!
दुःखाच्या बाजारी अन् सुखाच्या गावी नेहमी सोबत असावा..
हृदयातील भाव त्याने डोळ्यातून वाचवा..
आवाजातील रस तो समजणारा असावा..!!१!!
घाव मजला होता जखम त्यास व्हावी..
मम वेदनेने अश्रु त्याच्या डोळ्यात वाहावी...
न सांगताच आपले कोडे उलगडणारा असावा..!!२!!
असता कसाही काळ,वेळ नी प्रहर..
आवाज देण्या आधी माझा असावा हो हजर...
हात हातामधला कधी न सोडणारा असावा..!!३!!
जन्मोजन्मी असा साथी तुजला मिळावा..
मैत्रीचा हा अर्थ तुझ्यातुनी कळावा...
मरणातूनी सुधाकर तू त्यास तारणारा असावा..!!४!!
