जीवनाचा तमाशा...
जीवनाचा तमाशा...
रंगमंचावरचा खेळ नाही मज आला
जीवनाचा माझ्या तमाशा हा झाला.........!! दृ,!!...
आपलीच नाती अन् आपलीच गोती,
दुःख का रे देती सांगा कशासाठी..
नात्याच्या वाळवंटी देह माझा कुजला...!!१!!
बांधलेत हात माझे आपल्याच लोकांनी,
सांगा न्याय मागू मी कोणत्या ठिकाणी...
तत्वाचा माझा मी कसा करू पाला....!!२!!
मनामधी घाव चेहऱ्या आणू कसं हसू,
ज्याच्या त्याच्या तालावरती सांगा कसा मी नाचू...
पडद्यामागचा आवाज हा कसा कळेना कुणाला...!!३!!
जीवन हे बनलंय वग जीवनाची धग,
करू किती शृंगार हा चढेनाच साज...
वाचाळ हा सुधाकर आज कसा मूक झाला..!!४!!
