साथ...
साथ...
तुझ्या माझ्या वाट्याला हे आलं आज दुःख,..
करू त्यास पार सखे देऊनिया साथ..!! द्रू!!
आपलीच माणसं आपलाच करू लागले द्वेष,
तुझा माझा वागण्यात नसता काही दोष...
विचारानं सुन्न मन कधी पडलं ही कात...!!१!!
फुलापरी वाढली तू नाही झाली इजा,
माझा मुळ सखे तुला होते आज सजा...
उजेडाची करू आस संपलही रात...!!२!!
मनातील घाव सखे नको कुणा दावू,
सांग अशा नात्याल काय नाव देऊ...
लागलीय आग उरी होय हा आकांत..!!३!!
तुझे माझे भोग कधी हे सरल,
हर्षाने बाग आपली कधीही फुललं...
सुधाकर सवे उभी तू ही रणात..!!४!!
